anekant.news@gmail.com

9960806673

यशवंत कारखान्याची 9 मार्चला निवडणूक

पुणे ः थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचा सन 2024 ते 2029 या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 21 संचालकांच्या जागांसाठी येत्या सोमवार दि. 5 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होत आहे. तर आवश्यकता असेल तर यशवंतच्या निवडणुकीसाठी 9 मार्च रोजी मतदान घेतले जाणार आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्रान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले असून, सहकार उपनिबंधक डॉ. शितल पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याची अंतिम मतदार यादी 17 जानेवारी रोजी अंतिम करण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत दाखल करता येतील.
5 फेब्रुवारीपासून उमेेदवारी अर्ज दाखल करता येतील, 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत ते दाखल करून घेतले जाणार आहेत. दि. 12 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अजाची छाननी होईल. पात्र उमेदवारी अर्ज 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता घोषित केले जातील तर 13 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ आहे. अंतिम उमेदवारी अर्ज 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होऊन पात्र उमेदवारांना निशाणी वाटप केले जाणार आहे. तर आवश्यकता असेल तर 9 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होेईल. (पुढारी, 03.02.2024)