आडवाटेने तळ्याकडे जातांना
वाटेवर ती दिसली चालतांना
शीळ घातली मी ओळखीची
कळी खुलली हो प्रेमिकेची ॥१॥
तळ्यात दोघे पाय टाकून बसल्यावर
काहूर उठे लाटांचे तिच्या मनावर
ओळखीने जरा कात टाकल्यावर
दोघे मनी डोलति गोष्टी सरल्यावर ॥२॥
मन मोहरले खात चणे फुटाणे
साक्षीला होते खारे शेंगदाणे
मंतरले क्षण टिपति वाटाणे
प्रेम जागविती मक्याचे दाणे ॥३॥
रुपक होते गुलाब गज-याचे
मनात होते भाव जवळीकीचे
गजरा तिला अन सुगंध मला
आपुलकीचे बोलांनी आला ॥४॥
अजुनि डोळे हे जुल्मि गडे
कटाक्षहि ओळखति भाबडे
गुजगोष्टीत सरे रात्र फुटे तांबडे
तरीहि जमिनीवर राहणे आवडे ॥५॥
रचनाकार:आहेर वा.र.नासिक बी.ई.एमआयई.बीओई
9958782982