जयसिंगपूर ः शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 2023-24 च्या ऊस गळीत हंगामामध्ये शनिवार 97 व्या दिवशी 11 लाख मे.टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारी अखेर आलेल्या उसाचे बिल प्रतिटन 3101 रूपये प्रमाणे 284 कोटी 32 लाख रूपये ज्या त्यावेळी अदा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी दिली.
पाटील म्हणाले दत्त शेतकरी कारखान्याने चालू गळीत हंगामात 12 लाख 50 हजार मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऊस वाहतुकदार, ऊसतोडणी मजुर यासह अन्य घटकांचे 44 कोटी 42 लाख रूपये अदा करण्यात आले आहेत. ऊस बिल, ऊस वाहतूक व ऊसतोडणी मजूरांचे असे एकूण 328 कोटी 74 लाख रूपये देण्यात आले आहेत. (पुढारी, 03.04.2024)