anekant.news@gmail.com

9960806673

शंकर कारखान्याची रणधुमाळी

अकलूज ः सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 22 ते 29 जानेवारी असून, अर्ज छाननी 30 जानेवारी रोजी होईल. वैध उमेदवारांची यादी 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 14 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत असून, 14 फेब्रुवारीस उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. तर 25 फेब्रुवारी रोजी मतदान तर 26 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी नामदेव टिळेकर काम पाहात आहेत. शंकर कारखान्याच्या 21 संचालकांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. (लोकमत, 28.01.2024)