anekant.news@gmail.com

9960806673

कार्बनडाय ऑक्साईड पासून इथेनॉल एक विज्ञानाची किमया

हे विश्‍व अनेक रहश्याने भरलेले आहे आणि त्या सर्व रहस्यांचा मानव अनेक वर्षांपासून शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मानवाने परवाच चांद्रयान 3 चंद्रावरती यशस्वीरित्या उतरवले. अश्या बर्‍याच गोष्टींचा शोध मानवाला भविष्यात हि लावतच राहावा लागणार आहे. कारण एखादी गोष्ट शोधून काढताना अनेक अडचणींना समोर जावे लागते. हे करत असताना अनेकवेळा अपयश हि येते परंतु साततने त्या उद्देश्याचा पाठपुरावा केल्यास यश आपणाला नक्कीच मिळते.
जशे नवयुगासाठी आपणाला अवकाशातीन गोष्टींचा अभ्यास करणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे आपणास पृथ्वरीवरती ही बर्‍याच गोष्टीचा शोध लावणे गरजेचे आहे. जेणेकरून त्या गोष्टी मानवाच्या भविष्यातील वास्तव्य सुखकारक व शांततामयी बनवतील.
आज मानवाला सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्‍न म्हणजे प्रदूषण. आज वाढत्या यांत्रित्रकीकरण, स्वयंचलित वाहनाचा मोठ्याा प्रमाणात वापर, वाढत चाललेली लोकसंख्या व त्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वाढत चाललेला मानवाचा निसर्गामध्ये हस्तक्षेप अस्या अनेक गोष्टींमुळे हवा, पाणी, माती प्रदूषित होत चालल्या आहेत. हे प्रदूषण वाढत गेल्यास मानवाच्या भवितव्यास फार मोठा धोका आहे.
या वाढत चाललेल्या प्रदूषणामध्ये कारखानदारी व स्वयंचलित वहाने मुख्यतः कारणीभूत ठरत आहेत. परवाच एक बातमी वाचली की, हवेतील कॉर्बनडाय ऑक्साईड पासून इथेनॉल निर्मिती शक्य आपण आजपर्यंत ऊस, बीट व अन्य वनस्पतीपासून (ज्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते) मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती करीत आहोत. आता थेट हवेतील कार्बनडाय ऑक्साईड पासून इथेनॉल निर्मिती करणे शक्य आहे असे तमिळनाडूमधील रामचरण या कंपनीने हवेतील कार्बनडाय ऑक्साईडपासून इथेनॉल निर्मिती शक्य असल्याचा दावचा केला आहे आणि या प्रक्रियेद्वारे निर्माण होणारे इथेनॉल हे इंधन गुणवत्तेचे असेल व ते पेट्रोलमध्ये मिश्रण करता येईल असेही या कंपनीचे म्हणणे आहे. या कंपनीच्या विशेष व पर्यावरण पूरक संशोधनामुळे पर्यावरणाला महत्त्व देणार्‍या मानस सारख्या कंपन्यांनी त्यांच्याबरोबर करारही केला आहे.
हा प्रयोग जर मोठ्या कारखाना स्तरावरती यशस्वी झाल्यास हे मानवाचे एक पर्यावरणपूरक उत्क्रांतीतील महत्त्वाचे पाऊल ठरेल यात शंकाच नाही. जागतिक संसाधन संस्था (भारत) ने केलेल्या विश्‍लेषणानुसार 20230 मध्ये एकट्या मुंबई शहराचे हरितगृह वायू (ॠीशशप र्केीीश ॠरी) उत्सर्जन शिखरावर जाण्याचा अंदाज आहे. वार्षिक उत्पादन 26.80 दशलक्ष टन कार्बनडाय ऑक्साईड एकट्या मुंंबई शहरामध्ये होईल. या थेट हवेतील कार्बनडाय ऑक्साईड पासून इथेनॉल निर्मिती संशोधनामुळे अश्या वाढत चाललेल्या हवेतील कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्यास मदत होईल व हवेचे प्रदूषण कमी होईल.
उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी 10 ते 15 लिटर पाणी लागते ज्यापासून 5 ते 10 लिटर सांडपाणी निर्माण होते ते निर्माण होणारे सांडपाणी अनेक रसायनयुक्त असते. त्या सांडपाण्यामध्ये पर्यावरणास हानिकारक असणारे अनेक घटक असतात. ज्यासाठी पुन्हा त्या पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करावे लागते. उसापासून इथेनॉल निर्मिती करीत असताना अजून स्पेंटवॉश, यीस्ट स्लज, स्पेंट लीज सारखे पर्यावरणास हानिकारक असणारे घटक प्रदूषण निर्माण होतात व त्यांच्यावर प्रक्रिया करणे फारच खर्चिक व जटिल काम असते पाण्याची नासाडी होते ते वेगळेच.
म्हणून जर हवेतील कार्बनपासून थेट इथेनॉल म्हणजेच इलेक्ट्रो-कॅटॅलिटिक कॅप्चर उज2 रिडक्शन (एउउठ) प्रणालीद्वारे इथेनॉल निर्मिती व्यावसायिकदृष्ट्या कारखाना स्तरावरती झाल्यास व तो यशस्वी झाल्यास मानवास एक प्रकारची लॉटरीच लागेल कारण सर्व अंगानी फायदाच होईल. एक तरी हवेतील कार्बन शोसून घेतल्याने हवेचे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल. पर्यावरण पूरक इंधन निर्माण होईल, इंधन निर्मितीस कोणताही नैसर्गिक मानव उपयोगी कच्या मालाचा वापर न करता इंधन निर्मिती शक्य होईल. जेणेकरून तो कच्चा माल इतर पदार्थ निर्मितीस उपयोगी ठरतील. पाण्याचे होणारे प्रदूषणास आळा बसेल त्यामुळे पाण्याचे संवर्धन होईल. अगदी माफक दरात इंधन निर्मिती शक्य झाल्याने इंधनाचे दर हि आवाक्यात राहतील. हि एक विज्ञान विश्‍वातील किमयाच म्हणावी लागेल. - भरतेश कामते, मो.नं. 9448440342, दादासाहेब माळी, मो.नं. 8796141988 (प्रेसनोट, 09.09.2023)