anekant.news@gmail.com

9960806673

13 सहकारी साखर कारखान्यांना कर्ज हमी

सर्वच कारखान्यांना हमीची गरज
कोल्हापूर ः राज्य शासनाने राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना कर्ज हमी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कारखान्याचा समावेश आहे. या कारखान्याला सर्वाधिक 350 कोटींची कर्ज हमी शासनाने दिली आहे. या हमीमुळे कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यंदा साखर कारखाने आर्थिक अडचणीत येणार आहेत. केंद्र सरकारच्या सुधारित धोरणामुळे इथेनॉलचे प्रकल्प बंद आहेत. आता कारखान्यांना स्पिरीट करावे लागणार आहे. त्याचबरोबर गेल्या चार महिन्यात घाऊक बाजारात साखरेच्या दरात प्रतिक्विंटल 150 रूपयांची घसरण झाली आहे.
साखरेचे दर वाढतील या हिशेबावर कारखान्यांनी उचल जाहीर केल्या आहेत. आता शेतकर्‍यांना त्याप्रमाणेच द्यावे लागणार आहे. त्यामुळे या आर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी कर्जे हवी आहेत. मात्र बहुतांशी कारखान्यांचे ताळेबं पाहिले तर कोणतीही बंँक कर्ज देण्यास तयार होईल, असे सध्या तरी चित्र नाही. यासाठी राज्य शासनाने कर्ज हमी देण्याची गरज असते. यासाठी सर्वच कारखान्यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे. मात्र, केवळ 13 कारखान्यांना हमी दिली आहे. (लोकमत, 21.03.2024)
या कारखान्यांना मिळाली कर्ज हमी
लोकनेते सुंदरराव सोळंके, बीड 104 कोटी
किसन वीर सातारा 305 कोटी
किसनवीर खंडाळा 150 कोटी
ज्ञानेश्‍वर कारखाना, नेवासा 150 कोटी
अगस्ती, अहमदनगर 100 कोटी
अंबाजोगाई, बीड 80 कोटी
शिवाजीराव नागवडे, श्रीगोंदा 150 कोेटी
संत दामाजी, मंगळवेढा 100 कोटी
वृद्धेश्‍वर, पाथर्डी 99 कोटी
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे 125 कोटी
तात्यासाहेब कोरे वारणा, कोल्हापूर 350 कोटी
विठ्ठलसाई, धाराशिव 100 कोटी