anekant.news@gmail.com

9960806673

साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्चला संपणार

भेंडा ः राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्चला संपत आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून कामगारांची नवीन वेतनवाढ व सेवाशर्तीत बदल करण्यासाठी त्रिपक्ष समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली. तसेच राज्यातील साखर कामगारांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा केली. राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांची मुदत 31 मार्चला संपत आहे. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून कामगारांची नवीन वेतनवाढ व सेवाशर्तीत बदल करण्यासाठी राज्य सरकार, साखर कारखाना व कामगार संघटना यांचे प्रतिनिधी असलेली त्रिपक्ष समिती गठित करण्याची मागणी केली. (लोकमत, 16.03.2024)