anekant.news@gmail.com

9960806673

ट्वेंटीवन शुगर्सचे 5 लाख मे.टन उसाचे विक्रमी गाळप

परभणी ः ट्वेंटीवन शुगर्स साखर कारखान्याकडून चालू गळीत हंगाम 2023-24 साठी गाळप झालेल्या उसाला 2500 रूपये रक्कम अदा करण्यात आली आहे तर अंतिम ऊस दर प्रतिटन 2700 रूपये देण्याचा निर्णय झाला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर गाळप झालेल्या ऊस बिलाची उर्वरित रक्कम रूपये 200 लवकरच अदा करण्यात येणार आहे. गळीत हंगाम प्रगतीपथावर असून या हंगामात 5 लाख 16 हजार 817 मे.टन पेक्षा अधिक उसाचे गाळप करीत कारखान्याने विक्रमी गाळप केले आहे.
सध्या आसवनी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना येणार्‍या काळात चांगला भाव देता यावा यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. या भागातील सभासद, ऊस उत्पादकांनी आपला जास्तीत जास्त ऊस ट्वेंटीवन शुगर्सला द्यावा असे आवाहन माजी आ. अमित देशमुख यांनी केले आहे. (एकमत, 28.04.2024)