anekant.news@gmail.com

9960806673

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून ऊस संशोधन केंद्रास कुबोटा ट्रॅक्टर भेट

राहूरी ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन पुणे येथील वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांचेकडून पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रास 21 एच.पी. कुबोटा ट्रॅक्टर आणि रोटावेटर, पेरणी यंत्र, सारायंत्र, नागर व रिजर अशी पाच अवजारे भेट देण्यात आली. द्वारकाधीश कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन धुळे येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील व पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांच्याकडे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असो.अध्यक्ष श्री. ठोंबरे यांनी ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूदर्र् केल्या.

डॉ.सी.एस. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या उसाच्या विविध वाहनांची तसेच ऊस लागवड तंत्रज्ञान शिफाशीमुळे राज्यातील ऊस उत्पादनामध्ये क्रांती व साखर उद्योगाची भरभराट झाल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी पाडेगाव ऊस संशोधन केद्रास कुबोटा ट्रॅक्टर अवजारासह भेट दिल्याबद्दल असोसिएशन प्रति आभार व्यक्त केले. (जनता आवाज, 11.03.2024)