बेळगाव ः ऊस पीक आता केवळ साखर उत्पादनासाठी मर्यादित राहिले नाही. उसाद्वारे इथेनॉल उत्पादन मोठ्या स्वरूपात घेतले जात आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील मोठे ऊस उत्पादन पाहिल्यास भविष्यात बेळगाव इथेनॉल उत्पादनाचे हब होऊ शकते. त्यासाठी कर्नाटक राज्य शासनाकडून व्यापक प्रयत्न अपेक्षित असल्याचे केंद्रिय राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगाव येथे आयोजित कार्यक्रमात दीपप्रज्वलनाने रस्ते विकासकामांना चालना देताना सांगितले.
बेळगावात ऊस उत्पादन जादा घेतले जाते. उसापासून इथेनॉल निर्मितीमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. इथेनॉल उत्पादन वाढविल आणि इथेनॉल पंप सुरू केल्यास वानधारकांना केवळ 60 रूपयांत इंधन मिळू शकेल. त्यामुळे शेतकर्यांना चांगला नफ मिळेल. शेतकरी आणि पर्यावरणाचे संवर्धन होईल. यामुळे राज्य सरकारने बेळगाव जिल्ह्यात इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
काही दिवसांत भारत जगाला इथेनॉल निर्यात करेल. भविष्यात इथेनॉल व मिथेनॉलवर आधारित वाहने रस्त्यावर आणून शेतकर्यांच्या आर्थिक विकासासह पर्यावरण संवर्धनावर भर दिला जाईल, असेही गडकरी म्हणाले. (सकाळ, 23.02.2024)