anekant.news@gmail.com

9960806673

गंगामाऊली शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज गळीत हंगाम २०२४-२५ चा मिल रोलर पूजन

गंगामाऊली शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. अशोक नगर, उमरी, ता.केज जि.बीड या कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ चा मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम आज दि. १८ जुन २०२४ मंगळवार रोजी खा.रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, कारखान्याचे चेअरमन लक्ष्मणराव मोरे, कार्यकारी संचालक प्रवीण मोरे, व्हॉईस चेअरमन हनुमंतराव मोरे, राहुल सोनवणे, बीड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेसाहेब देशमुख, प्रताप मोरे तसेच ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सत्यनारायण पुजा कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी आय मुजावर, चिफ इंजिनिअर मुकशीद, चिफ केमिस्ट सरवदे, मुख्य शेतकरी अधिकारी आदनाक यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सर्व कर्मचारी उपस्थित होते.