anekant.news@gmail.com

9960806673

भारतात इथेनॉल मिश्रणाचा वेग मंदावणार

अमेरिकेच्या कृषी विभागाचा अंदाज, विपरीत परिस्थितीचा परिणाम
कोल्हापूर ः भारताचे इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असले तरी नैसर्गिक परिस्थिती आणि कच्च्या मालातील उत्पादन घटीमुळे पेट्रोलमधील अपेक्षित इथेनॉल मिश्रण भारताला गाठण्यात अडचणी येत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात इथेनॉल मिश्रणाचा वेग मंदावला आहे. परिस्थिती बदलली नाही तर भारत येणार्‍या वर्षातही इथेनॉल मिश्रण गतीने करु शकणार नाही, अशी भीती अमेरिकेच्या फॉरेल अ‍ॅग्रिकल्चर सर्व्हिस या विभागाने वर्तविली आहे..

भारतासाठी जारी केलेल्या जैवइंधन वाषिकक अहवालात इथेनॉलची परिस्थिती स्पष्ट केली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतात यंदाच्या वर्षाअखेर पर्यंत 600 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. उसापासून इथेनॉल तयार करण्यास आलेले निर्बंध व तांदाळापासून इथेनॉल करण्यावर बंदी घातल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी घट अपेक्षित धरली आहे.

भारतात इथेनॉलचा वापर 700 कोटी लिटरपर्यंत होईल. पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी 620 कोटी लिटर इथेनॉल लागेल, असा अंदाज विभागाने वर्तविला आहे. मागणीच्या तुलनेत इथेनॉल निर्मिती कमी होत असल्याने त्याचा परिणाम इथेनॉल मिश्रणावर होत आहे. एप्रिल 2023 मध्ये भारताने इथेनॉल मिश्रणाचा वेग मंदावला.

साखर उद्योगावर इथेनॉलसाठी मर्यादा घातली तेथूनच केंद्राच्या इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमावरही त्याचा परिणाम झाला. अशा निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीचा वेग कमी आहे. मक्याचे उत्पादनही घटले तसेच अनुदानित तांदळावरही बंदी घातली यामुळे ृसाखर उद्योगाव्यतिरिक्त इतर शेतमालापासून तयार होणारे इथेनॉलही कमी उत्पादित झाले. या सर्व घटकांचा परिणाम येेणार्‍या वर्षातही होण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे उद्दिष्टांइतके इथेनॉल मिश्रण करण्यात भारताला अपयश येऊ शकते.

पाण्याच्या ताणामुळे तांदळाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. परिणामी, इथेनॉल उत्पादनासाठी तुटलेल्या तांदळाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अन्नधान्याचा साठा कमी होत आहे. या फीडस्टॉकची उपलब्धता मागील वर्षाच्या तुलनेत आगामी वर्षासाठी अंदाजे 20 टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे.

कच्च्या मालातील उत्पादन घट - इथेनॉलसाठी मका उत्पादनाला चालनादेण्याच्या प्रयत्नात आहे. एमएसपी वाढवून मका खरेदीचा प्रयत्न केंद्राचा आहे. भारताचे इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू असले तरी नैसगिक परिस्थिती व कच्च्या उत्पादन घटीमुळे पेट्रोलमधील अपेक्षित इथेनॉल मिश्रण भारताला गाठण्यात अडचणी येत असल्याचेही अहवालात म्हटले आहे. (अ‍ॅग्रोवन, 15.06.2024)