anekant.news@gmail.com

9960806673

साखर, इथेनॉल उत्पादनाच्या अचूक माहितीसाठी एपीआय


केंद्रीय साखर सहसचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय

कोल्हापूर ः साखर आणि इथेनॉल उत्पादनाबाबत अचूकता येण्यासाठी आता केंद्राच्या वतीने हायटेक पाऊले उचलली जाणार आहेत. यासाठी अ‍ॅल्पिकेशन प्रोग्रॅमिंग इंडरफेस (एपीआय) या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे सर्व साखर कारखान्यांच्या इआरपी प्रणाली (कारखान्यांचे सॉफ्टवेअर) नॅशनल सिंगल विंडो सिस्टीम (एनएसडब्ल्यूएस) पोर्टलशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबत केंद्रीय साखर सहसचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग या प्रक्रियेसाठी पुढाकार घेणार आहे. साखर व इथेनॉल उत्पादनाची परिपूर्ण माहिती केंद्राला मिळावी यानुसार केंद्राला धोरण ठरविताना सुलभ व्हावे यासाठी ही सर्व माहिती एपीआयद्वारे संकलित होणार आहे. केंद्राने गेल्या वर्षांपासून साखर व अन्य पदाथार्र्ंची माहिती ऑनलाइन आणण्यासाठी डिजिटल गव्हर्नन्स ही संकल्पना राबवली आहेत.

विविध क्षेत्रातील व्यवहाराची माहिती केंद्राला कळावी यासाठी ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहेत. एनएसडब्ल्यूएस या पोर्टलवर साखर, ज्यूट पॅकिंग आदींची माितिी भरण्याची सक्ती केली आहे. एपीआयचा वापर झाल्यास साखर इथेनॉलसह अन्य पदार्थांच्या खरेदी विक्रीची माहिती केंद्राला ऑनलाइन विनासायास मिळू शकेल.

सध्या कारखान्यांची एनएसडब्ल्यूएस पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. कारखाने सध्या या पोर्टलवर मासिक माहिती भरतात. कारखान्यांनी पोर्टलवर जाऊन भरलेली माहितीच केंद्राला समजते. पण येथून पुढे कारखान्याचे सॉफ्टवेअर एपीआयद्वारे एनएसडब्ल्यूएस पोर्टलला जोडले जातील यामुळे सॉफ्टवेअरवर असणारी माहिती केंद्राला कळू शकेल.

एपीआयद्वारे मागवलेली माहिती सध्याच्या फॉरमॅटनुसार असेल. या प्रणालीची चाचणी पूर्ण झाली असून येत्या काही महिन्यात या प्रणालीचा वापर सुरू होईल. मानवी चूका टाळणे, अचूक माहिती मिळवणे, अनावश्यक माहिती कमी करणे आदी बाबींसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार असल्याचे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. (अ‍ॅग्रोवन, 13.06.2024)