anekant.news@gmail.com

9960806673

मांजरा शुगर इंडस्ट्रिजकडून उसाला एक रकमी एफआरपी अदा

धाराशिव ः तुळजापूर तालुक्यात गत हंगामात नव्याने दाखल झालेल्या मांजरा शुगर इंडस्ट्रिज प्रा.लि. या कारखान्याने पहिल्याच गळीत हंगामात गाळप केलेल्या शेतकर्‍यांच्या उसाला दर 10 दिवसाने एक रकमी प्रति मे.टन 2600 रूपये प्रमाणे रक्कम अदा केली आहे. पहिल्याच हंगामात एफआरपीपेक्षा जास्त ऊस दर देवून ऊस पुरवठादार शेतकर्‍यांच्या हिताची जपणूक केली आहे, अशी माहिती कारखान्याच्या वतीने देण्यात आलेली आहे.
कारखान्याने पहिल्याच गळीत हंगाम 2023-24 4 लाख 9 हजार 211 मे.टन उसाचे गाळप करून 4 लाख 41 हजार 527 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. तर 10.93 टक्के सरासरी साखर उतारा प्राप्‍त केला आहे. कारखान्याचा निव्वळ देय एफआरपी दर प्रति मे. टन रूपये 2430.82 एवढा येत होता. परंतु कारखान्याने गाळप हंगामाच्या सुरूवातीपासून ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्‍यांना दर 10 दिवसाने एक रकमी 2600 रूपये रक्कम अदा करून पहिल्याच हंगामात एफआरपी पेक्षा जास्त ऊस दर देवून शेतकर्‍यांंची आर्थिक जपणूक केली आहे.
येणार्‍या गाळप हंगामामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त साखर उतारा देणार्‍या व हेक्टरी उत्पादनात वाढ होणार्‍या ऊस जातीची लागवड मोठ्या प्रमाणात होणेसाठी कारखान्यामार्फत ऊस विकास योजना राबविण्यात येणार आहे. तरी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी घ्यावा असे आवाहन कारखान्याने जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी केले आहे. (एकमत, 09.06.2024)