anekant.news@gmail.com

9960806673

दौंड शुगरचे ऊस लागवड धोरण जाहीर

वीधवल जगदाळे यांची माहिती

देऊलगावराजे ः येथील दौंड शुगर कारखान्याचे 2024-25 या गळीत हंगामाचे ऊस लागवड धोरण जाहीर झाले आहे. यामध्ये आडसाली लागवड दि. 1 जुलै पासून शेतकर्‍यांनी सुरू करून 31 ऑगस्टपर्यंत लावावी तसेच पूर्व हंगाम दि. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू दि. 1 डिसेंबरपासून 28 फेब्रुवारीपर्यंत लागवड करावी.

फेब्रुवारीपर्यंत उसाच्या खोडव्यांच्या नोंदी शेतकर्‍यांनी आपल्या गटातील कार्यालयामध्ये द्याव्यात तसेेच यामध्ये प्रामुख्याने उसाच्या मुख्य जाती को 86032, कोएम 265, व्हीएसआय 8005, कोसी 671, फुले ऊस 15012, को व्हीएसआय 18121 आदी जातींचा समावेश असल्याची माहिती कारखान्याचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.

शेतकर्‍यांना उसाच्या उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्यामार्फत शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबवण्यात येत असून त्या योजनांचा लाभ शेतकर्‍यांनी यामध्ये ठिबक सिंचन, ऊस रोपे पुरवठा, सबसॉयलरची उपलब्धता, आंतर मशागतीसाठी लहान ट्रक्टरचे वापर, शेतकरी सहली, हिरवळीचे खते, बायोकंपोस्ट खत, माती, पाणी परिक्षण, रासायनिक खते, जैविक खते, औषधे इ. योजनेचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा असे कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून शेतकर्‍यांना करण्यात आले आहे. कारखान्यामार्फत उधारीवर कंपोस्ट खत दिले जात असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. (प्रभात, 31.05.2024)