रघुपति राघव राजाराम।पतितपावन सिताराम ॥
खरदुषणसंहारक राम।कौसलेचा लल्ला श्रीराम॥
मर्यादा पुरूषोत्तम राम।मातृपितृभक्त श्रीराम ॥
रावणांतक श्रीराम।निषादराजाचा मित्र राम॥१॥
शबरीचा सखा राम।आहिल्योधारक श्रीराम॥
दाशरथनंदन श्रीराम।पंचवटी निवासी राम ॥
सुग्रीवाचा मित्र राम।वानर सेनानायक राम॥
सौमित्राचा बंधु राम ।माता जानकीचा राम ॥२॥
हनुमानजीचा राम।रघुकुल तिलक राजाराम ॥
जानकीनाथ सिताराम। एकवचनी एकपत्नी राम ॥
सत्यवचनी एक बाणी राम।अयोध्यापति राजाराम ॥
ॠषीमुनींचे दैवत राम।ऐका अखंडीत रामनाम ॥३॥
प्रत्येकाच्या मनात राम।बजरंगीच्या ह्रदयतला राम॥
अयोध्येचा राजा राम ।प्रजाहित दक्ष श्रीराम ॥
शूरवीर कोदंडधारी राम ।न्यायप्रिय भगवान राम ॥
जळी काष्ठी पाषाणी राम। कामात आहे राम॥४॥
रजकनिंदा ऐकताच सीतेचा त्याग करि राम।
कबीराचे शेले विणितसे भक्तवत्सल राम॥
भक्त तुलसीदासाचे दोहे लिहितात श्रीराम ।
श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम ॥५॥
रचनाकार:आहेर वा.र.नासिक बी.ई.एमआयई.बीओई
९९५८७८२९८२