मंगळवेढा ः संत दामाजी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात 16 ते 30 नोव्हेंबरपर्यंत पुरवठा केलेल्या उसाचे बिल 2701 प्रमाणे ऊस पुरवठादार सभासद शेतकर्यांच्या सोयीने बँक खात्यात वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली. कारखान्याने आज अखेर एकूण 1,58,945 मे.टन ऊस गाळप करून 1,50 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. दररोज 3600 ते 3900 मे.टन गाळप होत आहे.
कारखान्यावर येणार्या उसाचे वजन बाहेर जाणार्या साखर, मोलॅसिस, प्रेसमड तालुक्यातील इतर व्यापार्याच्या वाहनांचे वजन एकाच काट्यावरून केले जाते. येणार्या मालासाठी एक वजनकाटा व जाणार्या मालासाठी दुसरा वजनकाटा दामाजी कारखान्यावर नाही. हे सुज्ञ ऊस उत्पादक शेतकरी व सभासद जाणून आहेत. - शिवानंद पाटील, चेअरमन (पुढारी, 24.12.2023)